Home [मुख्य पान]|Previous Issues [मागील अंक] | Advertise [जाहिरात]  | Register of Mandals [मंडळ नोंदणी] |

Contact Us [संपर्क] | Sanman [सन्मान] | Services [सेवा सुविधा] | NRI Remittances - Book

तुम्ही अनिवासी भारतीय किंवा अनिवासी महाराष्ट्रीयन आहात का? तुम्हाला मराठी समजते का? वाचता लिहिता बोलता येते का?

पांथस्थ तर्फे तुमचे स्वागत आहे. हा मंच तुमचा आहे.

पांथस्थ कोण आहे

पांथस्थ व्यक्तीशी निगडीत आहेच, पण पांथस्थ एक विचार, एक जीवनशैली देखील आहे. महाराष्ट्रातराहणारा महाराष्ट्रीअन किंवा मराठी माणुस म्हणजे पांथस्थ असे आपण म्हणतो. मुळ गावघर सोडून उपजीविकेसाठी जगभर गेलेला, स्थलांतरित झालेला अनिवासी भारतीय म्हणजे "विश्व पांथस्थ". महाराष्ट्र सोडून परराज्यातपरदेशात गेलेला मराठी माणुस हा देखील पांथस्थपरराज्यातून महाराष्ट्रात उपजीविकेसाठी महाराष्ट्रात येउन "मराठी" झालेला माणुस देखील "पांथस्थ"च. या पांथस्थांचे महाराष्ट्राच्या समाजकारणात, अर्थकारणातराजकारणात खूप महत्व आहे. त्यांच्या गरजा समजून घेणेत्यानुसार शक्यतो एकमेकांना मदत करणे काळानुसार अत्यावश्यक झाले आहे. अर्थात पांथस्थ हा एक विचार देखील आहे. ज्याचा प्रवास सतत चालू आहे, जो अनावश्यक ओझे जवळ बाळगत नाही व जो प्रवासाचा आनंद लुटतो तो देखील पांथस्थच. आध्यात्माच्या भाषेत सांगायचे झाले तर परमात्म्यापासून अलग झालेला आत्मा, ज्याने तात्पुरते मनुष्य शरीर धारण केले आहे असा जीव म्हणजे देखील "पांथस्थ" च.

विश्व पांथस्थ मासिकओळख

विश्व पांथस्थहे अनिवासी मराठी भारतीयांसाठी २०१५ पासून अधिकृतरित्या प्रकाशित होणारे पहिले मराठी मासिक आहे. अमेरिकेत साधारणलाख मराठी राहत असावेत तर जगभर साधारण २० लाख मराठी असावेत असा अंदाज आहे. आखाती देशात अंदाजेलाख मराठी (महाराष्ट्राशी संबंधित) राहात असावेतत्यातील अंदाजे दोन लाख मराठी केवळ यु ए ई (युनायटेड अरब अमिरात) मध्ये असावेत असा एक अंदाज आहे. महाराष्ट्राबाहेर भारतात मध्य प्रदेशगुजरात मध्ये मराठी बहुसंख्येने आहेत. इतरही राज्यात मराठी माणुस शेकडो वर्षांपासून स्थायिक आहे. जगातील २५ पेक्षा जास्त देशांत मराठी माणूस पोहचला आहे. यातील बहुसंख्य मराठी कुठल्याकुठल्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, परंतु सर्वांपर्यंत एका पोहोचणे एक आव्हानच आहे. विश्व पांथस्थ मासिक, पांथस्थ वेबसाईटपांथस्थ मोबाईल ऍप आणि पांथस्थ सेवा हा महाराष्ट्राबाहेरीलभारताबाहेरील अनिवासी मराठी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी निर्माण केलेला पहिलाएकमेव मंच आहे.

विश्व पांथस्थ मासिकाचे संपादक प्रकाशक डॉ संदीप कडवे यांनी २०१२ साली "NRI Remittances From GCC" या विषयावर एक पुस्तक लिहिले. हे पुस्तक दुबई येथे प्रकाशित झाले, त्याच्या प्रती जगभरातील नामांकित संस्थांनी विकत घेतल्या. पुस्तकाबद्दल अधिक माहिती येथे. परंतु NRI च्या समस्या, विचार, साहित्य यांना सततजागतिक व्यासपीठ मिळावे म्हणून २०१५ साली विश्व पांथस्थ मासिकाची सुरुवात झाली. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, साहित्यिकांनी विश्व पांथस्थ मध्ये लेखन केले आहे. जुने अंक इथे वाचायला मिळतील.

 

आगामी अंकासाठी लेखक, जाहिरातदार यांनी संपादकांशी संपर्क साधावा.

 

संपादक - डॉ संदीप कडवे